भारतीय महिला संघ पोहचला अंतिम सामन्यात

टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक, जेमिमा रॉड्रिग्सची झुंजार खेळी

भारतीय संघ जिंकला

भारतीय संघ जिंकला

 

ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया वूमन्स यांच्यात फायनलमध्ये पोहचण्यासाठी जोरदार चुरस होती
जेमिमाह रॉड्रिग्ज हीने केलेल्या चाबूक शतकाच्या जोरावर वूमन्स टीम इंडियाने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील फायनलमध्ये धडक दिली आहे. ऑस्ट्रेलियाने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारतासमोर 339 धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 48.3 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं आणि फायनलचं तिकीट मिळवलं आहे. भारताने यासह गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं पॅकअप केलं आहे. तसेच साखळी फेरीतील पराभवाची अचूक परतफेड केली आहे. आता टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे.टीम इंडियाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 338 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला. भारताने फक्त 5 विकेट गमवून हे लक्ष्य गाठलं. जेमिमा रॉड्रिग्सने शतकी खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.