ईद साजरी करताना गंगा-जमूनी संस्कृतीचे दर्शन शिरखुर्मा वाटप करून सुधाकरराव नाईक शिक्षण संस्थांमध्ये ईद उत्सव उत्साहात

ईद साजरी करताना गंगा-जमूनी संस्कृतीचे दर्शन शिरखुर्मा वाटप करून सुधाकरराव नाईक शिक्षण संस्थांमध्ये ईद उत्सव उत्साहात

आलेगाव, ४ एप्रिल:

शेकापूर फाटा (कार्ला शिवार) येथे असलेल्या कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा,

सुधाकरराव नाईक माध्यमिक आश्रम शाळा आणि सुधाकरराव नाईक ज्युनिअर कॉलेज

Related News

यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र रमजान ईद साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी यांनी एकत्र येत शिरखुर्मा वाटप करून ईदचा आनंद साजरा केला.

रमजान महिना संपल्यानंतर येणारी ईद, ही मुस्लिम धर्मीयांसाठी आनंदाची पर्वणी असते.

यानिमित्ताने देशभरात इफ्तार पार्टीचे आयोजन होत असते. त्या परंपरेनुसार संस्थेच्या वतीने

दिनांक ३१ रोजी शिरखुर्मा वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी विविध धर्मांचे विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र आले होते.

एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत सौहार्दपूर्ण वातावरणात शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला.

यावेळी रमजान आणि ईदचा सामाजिक व धार्मिक महत्त्व शिक्षांकडून उलगडून सांगण्यात आले.

कार्यक्रमास परिसरातील मान्यवर, पालक आणि नागरिक यांची उपस्थिती लाभली होती.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक ऐक्य, सलोखा आणि धार्मिक सहिष्णुतेचा संदेश दिला गेला.

 

Related News