अदर पुनावालांची बॉलिवूडमध्ये मोठी गुंतवणूक!

धर्मा प्रोडक्शन्सचे 50 टक्के शेअर्स घेणार, 1000 कोटींची डील

अदर पुनावाला आणि धर्मा प्रोडक्शनमधील ही डील 1000

कोटींमध्ये होत असल्याची माहिती आहे. वॅक्सिन मेकर सीरम

Related News

इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला आता बॉलिवूड

इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करणार आहे. धर्मा प्रोडक्शन फिल्म

इंडस्ट्रीमधील मोठी कंपनी आहे. त्यामुळे त्यात हिस्सेदारी घेत

आता अदर पुनावाला फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करण्याच्या तयारीत

आहेत. आज म्हणजेच सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी कंपनीने ही

माहिती दिली. या डीलनंतर अदर पुनावाला यांची करण जोहरच्या

धर्मामध्ये जवळपास 50% हिस्सेदारी असेल. सध्या, करण जोहर

यांच्याकडे धर्माचा 90.7% हिस्सा आहे. त्यांच्या आई हिरू

यांच्याकडे 9.24% हिस्सा आहे. करारानंतरही करण जोहर

कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष राहतील. अपूर्व मेहता याही सीईओ

राहतील. बॉलिवूड जगतात सध्या झपाट्याने बदल होत आहे.

चित्रपटांचा दर्जा बदलत आहे. मनोरंजन उद्योगात प्रगत तंत्रज्ञान

आणि उत्पादन पद्धती येत आहे. सामग्री निर्मिती, वितरण आणि

प्रेक्षक प्रतिबद्धता बदलणे हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे. पूनावाला

यांच्या गुंतवणुकीमुळे धर्म आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल. हा या

गुंतवणूकीमागचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

‘धर्मा हा नेहमीच हृदयस्पर्शी कथा-कथनासाठी ओळखला जातो.

अदार, एक जवळचा मित्र आणि दूरदर्शी आहे. आम्ही धर्माचा

वारसा नवीन उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहोत.’ असे मत करण

जोहरणे प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

Read also: https://ajinkyabharat.com/due-to-the-girl-child-scheme-bank-employees-in-the-state-were-empowered-on-16th-november/

Related News