अंदुरा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

अंदुरा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

अंदुरा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

अंदुरा (विष्णू वराळे) – भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन अंदुरा येथे देशभक्तीच्या वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या दीर्घकालीन गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा ऐतिहासिक सुवर्णदिन आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गावात जल्लोषात साजरा झाला.

गावातील स्व. जगदेवराव वराळे विद्यालय, प्राथमिक विद्यामंदिर आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ध्वजारोहण सोहळे पार पडले.

विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील वीरांचा गौरव करणारे भाषण, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शाळा परिसर तिरंग्याच्या रंगांनी सजवण्यात आला होता.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अंदुरा ग्रामपंचायतीत मुख्य सोहळा पार पडला. गावातील नागरिक, मान्यवर, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

ध्वजारोहणानंतर स्वातंत्र्यसैनिकांना व सामाजिक कार्यकर्त्यांना सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या सोहळ्यामुळे गावात देशभक्तीची भावना उंचावली असून, ‘जय हिंद’, ‘भारत माता की जय’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/independent-pranic-contribution-indescribable-posive-minister-sanjay-rathod/