अलीगड (उत्तर प्रदेश),
14 एप्रिल 2025 – अलीगडमधील अतरौली शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये देवी-देवतांचे चित्र असलेल्या
कागदी नैपकिनचा वापर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
या घटनेमुळे हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेत हॉटेलवर धडक दिली.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेत हॉटेल मालक सलीम याला अटक केली आहे.
विवाद कशामुळे झाला?
सुभाष चौकाजवळील ख्वाजा हॉटेल या ठिकाणी ग्राहकांना जेवणासोबत दिल्या जाणाऱ्या टिशू पेपरवर
भारत मातेची आरती आणि हिंदू देवी-देवतांचे चित्र छापलेले असल्याचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये मांसाहारी पदार्थ, विशेषतः मटण व बिर्याणी विकली जाते.
त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदूवादी कार्यकर्त्यांनी हॉटेलवर जाऊन गोंधळ घातला.
पोलीसांनी घेतली तातडीची कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि हॉटेल मालक सलीम याला तात्काळ ताब्यात घेतले.
सीओ सर्जना सिंह यांनी सांगितले की, “१४ एप्रिल रोजी अतरौली पोलीस ठाणे हद्दीत हा प्रकार उघडकीस आला.
पोलीसांनी तत्काळ कारवाई करत टिशू पेपर जप्त केले असून,
हॉटेल मालकावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. सध्या परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे.”
धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न?
या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली.
अशा प्रकारे धार्मिक भावना दुखावणाऱ्या घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका कायम असतो.
याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
Read Also : https://ajinkyabharat.com/nisargacha-amazing-miracle/