अकोल्यात महावीर जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन

महावीर जयंतीनिमित्त भव्य रॅली

अकोला (प्रतिनिधी):

भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवानिमित्त अकोला शहरात मंगळवार, ८ एप्रिल रोजी महावीर जयंती

मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Related News

या निमित्ताने शहरातील जैन समाज बांधवांकडून रात्री भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

जुन्या शहरातून रॅलीची सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगवान महावीरांच्या जयघोषात रॅलीने

शहरातील मुख्य मार्गांवरून संचलन केले. या रॅलीमध्ये महावीर भगवानांची भव्य प्रतिमा मिरवणुकीत मांडण्यात आली होती.

शहरातील विविध भागांत या रॅलीचे स्वागतही उत्स्फूर्तपणे करण्यात आले.

रॅलीमध्ये जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या धार्मिक उत्सवामुळे शहरात आनंद, भक्ती आणि शांततेचे वातावरण पाहायला मिळाले.

Related News