अकोला शिक्षण विभागाने सत्र सुरू

अकोला शिक्षण विभागाने सत्र सुरू

होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची घोषणा केली होती

मात्र शैक्षणिक सत्र सुरू होऊन सहा महिने उलटूनही अकोला जिल्ह्यातील नगर परिषद व जिल्हा परिषद

शाळांमध्ये शिकणाऱ्या ७० हजार ३९५ विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड गणवेशाची प्रतिक्षा करावी लागत आहेय…

Related News

शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या मोफत गणवेश वितरण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दोन गणवेश

देण्याचा निर्णय घेण्यात आला होता यामध्ये नियमित गणवेश आणि स्काऊट गाईड गणवेशाचा समावेश आहेय.
या योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यातील नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांतील

एकूण 70 हजार 395 विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाणार होते..योजने मार्फत दोन्ही गणवेश शैक्षणिक सत्र सुरू

होण्याच्या पहिल्याच दिवशी दिले जाणार होते..

मात्र नोव्हेंबर 2024 पर्यंत केवळ नियमित गणवेश उपलब्ध झाला असून सद्यस्थितीत उर्दू माध्यमाच्या सुमारे 13 हजार विद्यार्थ्यांना आतापर्यंत गणवेश मिळाला नाहीय..

शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची नगरपालिका

आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत पटसंख्या कमी होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहेय..

तर दुसरीकडे 70 हजार 395 विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडचा गणवेश देण्यात येणार होता,

मात्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून कापड उपलब्ध करून देण्यास आणि नंतर शिलाई करण्यात दिरंगाई झाली

अन योजना बारगळली.. विशेष म्हणजे दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी कापडाचा दर्जा व साइज् याबाबत आक्षेप घेतला होता…

यापूर्वी स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या स्तरावर

मोजमाप व शिलाई केल्यामुळे कपडे व्यवस्थित बनवले जात होते…

सध्या शिक्षण विभागाने स्काऊट गाईडचे गणवेश शिलाई करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समित्यांकडे दिली

असली तरी नवीन वर्षातच या विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याची शक्यता आहेय..

इतर येत्या आठ दिवसातच गणवेशाचा मुद्दा मार्गी लागणार असल्याच आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिला आहेय..

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/agricultural-festivals-and-discussions-are-about-to-be-organised/

Related News