आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा – रोहित पवार

आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा – रोहित पवार

आजपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असल्याची घोषणा आज अर्थसंकल्पात सरकारने करावी

अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

तसंच या महिन्यापासूनच लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची अपेक्षा आहे,

Related News

असंही त्यांनी म्हंटलं आहे. आजच्या अर्थसंकल्पात सुरुवातीलाच आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करतोय,

आणि आत्तापासून करतो आहे, अशी घोषणा सरकारने करावी. महिलच्या बाबतीत जर लाडकी बहीण

योजनेला तुम्ही 1500 रुपये देता. निवडणूक काळात ते पैसे तुम्ही अॅडव्हान्समध्ये दिले. आता तुम्ही 2100 रुपये

देणार नसल्याचं म्हणता. मात्र 2100 रुपये तुम्ही या महिन्यापासूनच तुम्ही लाडक्या बहिणींना दिले पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले.

Read more news here : https://ajinkyabharat.com/vidarbhathel-panitanchair-sorrurjecha-todga-babhi-gawacha-model-undertaking/

Related News